पिनारायी विजयन यांचा आज शपथविधी

By Admin | Updated: May 25, 2016 01:37 IST2016-05-25T01:37:42+5:302016-05-25T01:37:42+5:30

माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य पिनारायी विजयन हे आज बुधवारी केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता केंद्रीय स्टेडियममध्ये हा

Zanirai Vijayan sworn in today | पिनारायी विजयन यांचा आज शपथविधी

पिनारायी विजयन यांचा आज शपथविधी

थिरुवनंतपुरम : माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य पिनारायी विजयन हे आज बुधवारी केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता केंद्रीय स्टेडियममध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विजयन हे स्वत:कडे गृह आणि दक्षता विभाग ठेवतील आणि माकप नेते थॉमस इसाक हे राज्याचे नवे वित्तमंत्री असतील, अशी माहिती माकपच्या सूत्रांनी दिली. राज्यपाल पी. सदाशिवम यांनी सोमवारी विजयन यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. विजयन यांच्या मंत्रिमंडळात माकपचे १२ मंत्री राहतील. तर भाकपचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सेक्युलर काँग्रेस आणि जनता दलाचा (धर्मनिरपेक्ष) प्रत्येकी एक मंत्री असेल. विधानसभा अध्यक्षपद माकपाकडेच राहील.

Web Title: Zanirai Vijayan sworn in today