शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

युवराज सिंगचं दिवाळीला फटाके न फोडण्याचं आवाहन, चाहत्यांनी त्याच्याच लग्नाचा फोटो टाकून दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:36 IST

युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही ट्विटर युझर्सनी त्यालाच डबल स्टँडर्ड्सवरुन झापलं आहे.

ठळक मुद्देयुवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहेट्विटरवर काही युझर्सनी त्याच्या लग्नातील रिसेप्शनचा फोटो शेअर करत युवराजला सुनावलं आहेआपल्या लग्नात फटाके फोडायचे, आणि दिवाळीला प्रदूषणमुक्त साजरी करण्याचं आवाहन करण्याचा दुटप्पीपणा करायचा असं म्हणत युझर्सनी युवराजला टार्गेट केलं आहे

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीवर दिलेला आपला निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं असून, अनेक सेलिब्रेटिंनीही पाठिंबा दर्शवला आहे. निर्णयाचं समर्थन करणा-यांमध्ये भारतीय क्रिकेटर युवराज सिंगचाही समावेश आहे. युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. 

युवराज सिंगने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत युवराज सांगतोय की, 'या दिवाळीला कृपया फटाके फोडू नका अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे. गेल्या वर्षी आपल्या देशाची काय अवस्था झाली हे तुम्ही पाहिलंत. इतकं प्रदूषण झालं होतं की मला घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं. आपली मुल, वृद्द, मित्र, पालकांसाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. दिवे लावा, आनंद पसरवा, मिठ्या मारा, पत्ते खेळा पण कृपया फटाके फोडू नका. लहान मुलं मास्क लावून फिरताना पाहणं खुपच वेदनादायी असतं. आपण सर्वांनी जबाबदारी घेऊया....आपण नाही घेतली तर कोणीच घेणार नाही. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे'. 

अनेकांनी युवराज सिंग याने प्रदूषणमुक्त दिवाळीला पाठिंबा दिल्याने कौतूक केलं आहे. मात्र यावेळी त्याच्या दुटप्पी भूमिकेवरुन अनेकांनी टार्गेटही केलं आहे. ट्विटरवर काही युझर्सनी त्याच्या लग्नातील रिसेप्शनचा फोटो शेअर करत सुनावलं आहे. या फोटोत युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल दिसत असून त्यांच्या मागे फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचं दिसत आहे. आपल्या लग्नात फटाके फोडायचे, आणि दिवाळीला प्रदूषणमुक्त साजरी करण्याचं आवाहन करण्याचा दुटप्पीपणा करायचा असं म्हणत युझर्सनी युवराजला टार्गेट केलं आहे. 

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवताना फटाकेबंदीच्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याचं दु:ख होतयं असं म्हटलं होतं. दिवाळीनंतर प्रदूषणात काही फरक पडला का हे आम्ही पडताळून पाहणार आहोत असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं होतं. महत्वाचं म्हणजे न्यायालयाने फक्त फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. ज्यांनी आधीच फटाके खरेदी केले आहेत त्यांना हा निर्णय लागू नाही. ते फटाके फोडू शकतात असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठी परवानगी दिली असून वेळेची अट ठेवली आहे. रात्री 6.30 ते 9.30 दरम्यान फटाके वाजवण्याची परवानगी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिली असून, आदेशाचं पालन होतंय की नाही यासाठी पीसीआर व्हॅन लक्ष ठेवणार आहे. 

त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं होतं. ट्विटरच्या माध्यमातून तथागत रॉय यांनी आपली नाराजी व्यक्त करत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीचा दिलेला निर्णय गतवर्षी असहिष्णूता वाढल्याचा आरोप करत पुरस्कार परत करणा-या कलाकार आणि लेखकांपासून प्रभावित झाल्याचंही तथागत रॉय बोलले होते. 

ट्विटरवरुन तथागत रॉय यांनी आपला संताप व्यक्त केला होता. 'कधी दहीहंडी, आज फटाके, उद्या कदाचित प्रदूषणाचा दाखला देत मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता जाळण्याविरोधात याचिका करेल', असं ट्विट करत तथागत रॉय यांनी पुरस्कार परत करणा-यांवर टीका केली. 

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील निर्णयावर नाराजी व्यक्त करत फक्त फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? असा प्रश्न विचारला होता. फटाक्यांविना मुलांसाठी दिवाळीचा अर्थ काय ? असा प्रश्न चेतन भगत यांनी विचारला. चेतन भगत यांनी एकामागोमाग एक सलग ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली. 

टॅग्स :Yuvraj Singhयुवराज सिंगdiwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017fire crackerफटाके