शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

आधी दोन्ही हात मग मान अन्... आंध्र प्रदेशात YSR नेत्याची भररस्त्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:59 IST

आंध्र प्रदेशात भररस्त्यात वायएसआर काँग्रेसच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

Andhra Pradesh  :आंध्र प्रदेशात राजकीय नेत्यांच्या हत्यांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षातील नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता बुधवारी रात्री वायएसआर काँग्रेसच्या नेत्याची रस्त्याच्या मधोमध दोन्ही हात कापून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी हा चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाचा स्थानिक नेता अशल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ जखमीला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाला. 

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेच्या सदस्याची आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध हत्या करण्यात आली. ही हत्येची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वायएसआर काँग्रेसच्या शेख रशीद यांच्यावर टीडीपीच्या शेख जिलानी याने धारदार शस्त्राने हल्ला केला. परस्परांमध्ये झालेल्या भांडणातून हा सगळा प्रकार घडल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जिलानीने रशीद यांचे दोन्ही हात कापले आणि नंतर त्याच्या मानेवर जीवघेणा हल्ला केला. या निर्घृण हत्येमागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कांची श्रीनिवास राव यांनी सांगितले. यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचेही श्रीनिवास राव म्हणाले. या घटनेनंतर विनकोंडा शहरात कडक बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. कोणीही अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी वायएसआर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. राक्षस बनलेल्या टीडीपी नेत्याने निर्घृण हत्या केली. वायएसआरचे युवा नेते रशीद यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून मानेवरही खोल जखमा झाल्या आहेत, असे वायएसआर काँग्रेसने सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये टीडीपी नेत्यांना टॅग करत त्यांच्यावर पक्षपाताचे राजकारण केल्याचा आरोप केला.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस