शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:31 IST

Jyoti Malhotra : ज्योती २०२४ मध्ये तीनदा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत आली. प्रत्येक वेळी तिने मुंबईच्या विविध भागांचे फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले होते.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्यामुंबई भेटीचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणांना असं आढळून आले आहे की, ज्योती चार वेळा मुंबईत आली होती. ज्योती २०२४ मध्ये तीनदा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत आली. प्रत्येक वेळी तिने मुंबईच्या विविध भागांचे फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती जुलै २०२४ मध्ये एका लक्झरी बसने मुंबईला पोहोचली आणि ऑगस्ट २०२४ मध्ये ती अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसने मुंबईला आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ती पंजाब मेलने नवी दिल्लीहून मुंबईत आली. एवढंच नाही तर २०२३ मध्ये गणेशोत्सवादरम्यान तिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. दर्शनाच्या बहाण्याने लाखोंची गर्दी आणि संपूर्ण परिसराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

तपासात असं दिसून आलं की, ज्योतीने तिच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून अनेक व्हिडीओ आणि फोटो डिलीट केले होते, जे एका विशेष तंत्राचा वापर करून रिकव्हर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ आणि फोटो ती नेमकी कोणाला पाठवत होती किंवा पाठवले गेले आहेत आणि त्यात कोणती संवेदनशील माहिती होती? याचा पोलीस आणि सुरक्षा संस्था बारकाईने तपास करत आहेत.

"पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

ज्योती मल्होत्राचेपाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अली हसनसोबतचं आणखी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आलं आहे. यामध्ये ज्योती पाकिस्तानमध्ये लग्न करण्याबद्दल बोलत आहे. ज्योती मल्होत्राने स्वतः व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही, परंतु ज्योतीने सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची अशी इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. जर पाकिस्तानी युट्यूबर किंवा कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीशी लग्न केलं तर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतील. यामुळे तिच्या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळतील असं तिला वाटत होतं.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राMumbaiमुंबईIndiaभारतPakistanपाकिस्तान