शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:56 IST

पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले.

पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला आज हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. रिमांड कालावधी पूर्ण झाल्यानंतर ज्योतीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष न्यायालयात आणण्यात आले. ९५ दिवसांनंतर ती तुरुंगाबाहेर आली असून, यापूर्वी ती २२ मे रोजी न्यायालयात हजर झाली होती. आजची सुनावणी सुमारे अडीच तास चालली. सुनावणीनंतर पोलिसांनी तिला पुन्हा तुरुंगात नेले. यापूर्वी ज्योतीची सात वेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती.

१६ मे रोजी झाली होती अटक१६ मे २०२५ रोजी ज्योतीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ज्योती मल्होत्राचे वकील कुमार मुकेश यांनी सांगितले की, "आम्हाला अद्याप दोषारोपपत्राची प्रत मिळालेली नाही. पोलिसांनी अर्ज दिल्यानंतरच ती मिळेल, असे न्यायालयाने सांगितले आहे." पोलीस या प्रकरणात विलंब करत असल्याचा आरोप वकिलांनी केला. "आम्ही लवकरच दोषारोपपत्राच्या प्रतीची मागणी करणार आहोत. आरोपपत्र वाचल्यानंतरच जामीन अर्ज दाखल केला जाईल," असे ते म्हणाले. ज्योतीला पुढील सुनावणीसाठी ३ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

२५०० पानांचे दोषारोपपत्र दाखलया प्रकरणाचा तपास करण्यासाठी हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी एसआयटीची स्थापना केली होती. ज्योतीच्या अटकेनंतर ९० व्या दिवशी, म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी एसआयटीने सुमारे २५०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. तीन महिन्यांच्या तपासानंतर हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.

तुरुंगात वडिलांना बांधली राखी९ ऑगस्ट रोजी यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा हिला भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते. वडिलांना पाहताच ज्योतीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वडिलांनी धीर दिल्यावर ती त्यांना मिठी मारून रडू लागली. "तू लवकरच तुरुंगातून बाहेर येशील," असे वडिलांनी तिला सांगितले. ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी आपल्या मुलीवरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले असून, राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मुलीकडून राखी बांधून घेतली. 

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPakistanपाकिस्तानIndiaभारत