शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तरुणाईने नवभारत साकारावा, १८ ते २५ वयोगटाला पंतप्रधानांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 5:35 AM

देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.‘आकाशवाणी’वरील सरत्या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी खास करून सन २००० किंवा त्यानंतर जन्मलेल्या युवापिढीशी संवाद साधला. २१व्या शतकात जन्मलेले नागरिक येत्या वर्षापासून मतदार होण्यास पात्र ठरतील. त्यामुळे उद्याचा १ जानेवारी माझ्या दृष्टीने खास दिवस आहे, असे सांगून मोदींनी या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करून घेण्याचा आग्रह केला.मोदी म्हणाले की, लोकशाहीत मत ही सर्वात मोठी शक्ती आहे व लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे ते प्रभावी साधन आहे. युवापिढी ऊर्जा आणि संकल्पाने भारलेली आहे व या ऊर्जावान पिढीच्या कौशल्याने व ताकदीनेच नवभारताचे स्वप्न साकार होईल, याबद्दल मला खात्री आहे. हा नवभारत जातीयवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या विषांपासून मुक्त असावा. तेथे अस्वच्छता व गरिबीला मुळीच स्थान नसावे व त्यात सर्वांना आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची समान संधी मिळावी. शांतता, एकता व सद्भावना हेच अशा नवभारताचे सूत्र असावे.जनआंदोलनउभे राहावेतरुण पिढीने केवळ नवभारताचे स्वप्नरंजन न करता, त्यासाठी पुढाकार घेऊन विचारमंथन करावे, असे आवाहन करून, मोदी यांनी १८ ते २५ वर्षांच्या युवक-युवतींनी प्रत्येक जिल्ह्यात अभिरूप संसद भरवून यावर चर्चा करावी. प्रत्येक जिल्ह्यातील एक युवा प्रतिनिधी घेऊन, १५ आॅगस्टच्या सुमारास देशपातळीवरील अशा अभिरूप संसदेचे आयोजन दिल्लीतही केले जाऊ शकेल, असेही त्यांनी सुचविले. स्वातंत्र्यासाठी जसे जन आंदोलन उभे राहिले, तसे या विचारमंथनातून विकासाचे, प्रगतीचे, सामर्थ्यवान-शक्तिशाली भारताचे जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधीनरेंद्र मोदी सरकार हे फक्त पोकळ घोषणा देणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवून, स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या ९,८६० कोटी रुपयांपैकी केवळ ७ टक्के निधीच सरकारने खर्च केला आहे, असे रविवारी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत