शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील महापुरात ज्याने शेकडोंना वाचवले, त्याच्या मदतीसाठी कुणी नाही धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 11:14 IST

केरळमधील महापुरादरम्यान अनेकांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता शेकडो जणांना वाचवून नवा आदर्श निर्माण केला होता. अशा देवदुतांपैकी एक असलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

तिरुवनंतपुरम - यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. या महापुरादरम्यान सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अनेकजण देवदूतासारखे धावून आले होते. त्यांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता शेकडो जणांना वाचवून नवा आदर्श निर्माण केला होता. अशा देवदुतांपैकी एक असलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. दु:खद बाब म्हणजे केरळमधील महापुरादरम्यान शंभरहून अधिक जणांना वाचवणारा हा तरुण अपघातानंतर रस्त्यावर तडफडत असताना मदतीसाठी कुणीही धावून आला नाही. 

 जिनेश जेरोन असे या दुर्दैवी हिरोचे नाव आहे. रविवारी घरापासून 12 किमी अंतरावर जिनेशची दुचाकी घसरली. त्यानंतर त्याला मागून येणाऱ्या ट्रकची धडक बसली.  या भीषण अपघातात जिनेश गंभीर जखमी झाला. वेदनेने विव्हळत असताना तो येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीसाठी विनंती करत होता. मात्र अनेक जणांचे प्राण वाचवणाऱ्या या हिरोच्या मदतीसाठी थांबण्याची तसदी कुणी घेतली नाही. अखेर अर्ध्या तासाने एक  रुग्णवाहिका तिथे आली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर जिनेशचा मृत्यू झाला.  या अपघातावेळी जिनेशसोबत प्रवास करत असलेले जगन सांगतात की," जिनेशसारख्या व्यक्तीसोबत अशी दुर्दैवी घटना घडू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. त्याला दुसऱ्यांची मदत करणे आवडायचे. त्यामुळेच केरळमधील पुरादरम्यान तो अनेकांची मदत करून हिरो बनला होता."  जिग्नेश आणि त्याच्या मित्रांनी पुराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या चेंगन्नूर परिसरात 100 हून अधिक जणांचे प्राण वाचवले होते. चर्चकडून मच्छिमारांना मदतीसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर जिनेश आणि त्याच्या सहा मित्रांनी बोट घेऊन मदत कार्यास सुरुवात केली होती.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळAccidentअपघात