शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
5
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
6
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
7
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
9
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
10
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
11
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
12
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
13
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
14
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
15
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
16
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
17
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
18
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
19
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
20
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

केंद्राच्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेकडे तरुणांची पाठ; १.२५ लाख इंटर्नशिप्सची ऑफर; रुजू फक्त ८,७६०

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:38 IST

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून केवळ ८,७६० उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात इंटर्नशिप सुरू केली आहे...

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : देशातील लाखो तरुणांना दरवर्षी रोजगार प्रशिक्षणाची संधी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ला (पीएमआयएस) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने सरकार चिंतेत आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून केवळ ८,७६० उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात इंटर्नशिप सुरू केली आहे.

सरकारने १.२७ लाख इंटर्नशिपच्या संधी प्रमुख ५०० कंपन्यांमार्फत उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी तब्बल ६.२१ लाख अर्ज प्राप्त झाले. मात्र, ऑफर मिळाल्यानंतर फक्त २८,००० उमेदवारांनीच याचा स्वीकार केला. शेवटी फक्त ८,७६० जण प्रत्यक्ष रुजू झाले. दुसऱ्या फेरीत, २४,००० हून अधिक उमेदवारांनी इंटर्नशिपमध्ये सामील होण्यासाठी ऑफर स्वीकारल्या आहेत. परंतु दुसऱ्या फेरीत प्रत्यक्ष रुजू होण्याचे अधिकृत आकडे उघड केलेले नाहीत; कारण ते अद्याप प्रक्रियेत आहे. 

हा प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याचे दिसून येते.३२७ कंपन्यांनी १.१८ लाखांहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या. ४.५५ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आणि ८२,००० ऑफर देण्यात आल्या. सूत्रांचे म्हणणे आहे की, ही संख्या निराशाजनक आहे.

स्टायपेंड वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचारसरकार आता पीएम इंटर्नशिपसाठी स्टायपेंड (विद्यावेतन) वाढवण्याचा आणि इतर पावले उचलण्याचा विचार करत आहे. सध्या, पीएमआयएसमधील प्रत्येक उमेदवाराला दरमहा ५,००० स्टायपेंड मिळतो आणि एकदाच ६,००० रुपये जॉइनिंग ग्रँट दिले जाते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी या योजनेला सुरुवात केली. ज्यामध्ये एका वर्षात तरुणांना १.२५ लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

राज्यनिहाय इंटर्नशिप करणारे सर्वाधिक कुठे?उत्तर प्रदेश      १२४१ आसाम    ९९७महाराष्ट्र     ४१९गुजरात     २४९हरयाणा    २८९पंजाब    ६०गोवा     ३मिझोरम     १ 

English
हिंदी सारांश
Web Title : Youth shun PM Internship Scheme; only 8,760 join despite offers.

Web Summary : Government's PM Internship Scheme faces lukewarm response. Despite 1.25 lakh internships offered, only 8,760 candidates joined. Low stipend may be the reason.
टॅग्स :GovernmentसरकारStudentविद्यार्थी