शस्त्राचा धाक दाखवून युवकाची लूट

By Admin | Updated: May 16, 2016 23:23 IST2016-05-16T00:45:00+5:302016-05-16T23:23:33+5:30

नाशिक : अशोकस्तंभ येथून रामवाडीकडे पायी जाणार्‍या युवकास चाकूचा धाक दाखवून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी लुटल्याची घटना शनिवारी (दि़१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़

Youth robbery | शस्त्राचा धाक दाखवून युवकाची लूट

शस्त्राचा धाक दाखवून युवकाची लूट

नाशिक : अशोकस्तंभ येथून रामवाडीकडे पायी जाणार्‍या युवकास चाकूचा धाक दाखवून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी लुटल्याची घटना शनिवारी (दि़१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामवाडी येथील चंद्रकांत मोबिसिंग राठोड हा युवक रात्री अडीच वाजेच्या सुमारास अशोकस्तंभाकडून घरी पायी जात होता़ स्वामी समर्थ मंदिराजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण केली़ तसेच त्याच्याकडील मोबाइल, सोन्याची अंगठी व अमेरिकन डॉलर असा २४ हजार ६९० रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Youth robbery