शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

कोरोनाची भीती : मुंबईहून 1600 किमीची पायपीट करत घरी पोहोचला मुलगा, पण आईने दरवाजा उघडलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 11:59 IST

मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती.

ठळक मुद्दे1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. लॉकडाऊनची घोषणा होताच अशोक 14 दिवसांपूर्वी आपल्या 6 मित्रासह मुंईहून निघाला होताअशोकला 14 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे

वाराणसी : कोरोना व्हायरस आता नात्यांमधील जिव्हाळ्याचीही जाणीव करून देऊ लागला आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातीलवाराणसीत घडला. मुंबईत काम करणारा एक तरून लॉक डाऊन होताच आपल्या 6 मित्रासह पायपीट करत घरी गेला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर कोरोनाच्या भीतीने ना आईने दरवाजा उघडला, ना भाऊ आणि वहिणीने. जवळपास 1600 किमीची पायपीट केल्याने या तरुणाची प्रकृतीही खालावली होती. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला मैदागिन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल कले. आता त्याची प्रकृती ठीक. खरे तर हा तरूण तपासणी करूनच घरी परतला होता आणि त्याला 14 दिवस क्वारंटाईन राहण्यासही सांगण्यात आले होते. अशोक केसरी, असे या तरूणाचे नाव आहे. तो मुळचा वाराणसी येथील असून सेंट्रल मुंबईतील नागपाडा येथे एका हॉटेलवर तो काम करत होता. 

लॉकडाऊनची घोषणा होताच अशोक 14 दिवसांपूर्वी आपल्या मित्रासह मुंईहून निघाला होता. रविवारी सकाळी तो रेल्वे पटरीच्या मार्गाने येथील स्टेशनवर पोहोचला. येथूनच घरच्यांना फोन करून आपण आल्याची माहिती दिली होती. यावेळी त्याने आपल्या सोबत आलेल्या 6 मित्रांसंदर्भातही सांगितले होते. ते पं. दीनदयालनगर आणि रामनगर भागातील आहेत. हे सात जण मुंबईहून आल्याचे समजताच घरच्यांनी शेजारच्यांना याची कल्पना दिली. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधलाचे वातावरण निर्माण झाले. अशोक तपासणीसाठी बराचवेळ फिरत होता.  अखेर त्याला पं. दीनदयाल उपाध्याय जिल्हा रुग्णालयात तपाणी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर तो तेथे गेला. 

अशोक म्हणाला, तपासणीनंतर आपल्याला 14 दिवस घरातच एकांतवासात राहण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर मी घरी पोहोचलो, मात्र आई आणि वहिणींनी दरवाजा उघडला नाही. अशोकला मुंबईतच कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशे त्यांना वाटते. 

मित्रांनाही तपासणी करण्यची सूचना -यासंदर्भात बोलताना, संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षक महेश पांडेय म्हणाले, रुग्णालयातीन तपासणी करून तो घरी पोहोचला होता. मात्र, घरच्यांनी त्याला घरात घेण्यास नकार दिला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, थकवा आल्याने त्याची प्रकृती खालावली असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यात कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही. त्याच्या कुटुंबीयांनी ऐकले नाही तर त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशोकच्या मित्रांनाही तपासणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीPoliceपोलिसIndiaभारत