युवक बेपत्ता
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
अकोला: मूर्तिजापुरातील तिडकेनगरात राहणारा १८ वर्षीय युवक पुण्याला जात असल्याचे सांगून २६ नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडला; परंतु अद्यापपर्यंत तो घरी न परतल्याने, त्याच्या कुटुंबीयांनी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

युवक बेपत्ता
अ ोला: मूर्तिजापुरातील तिडकेनगरात राहणारा १८ वर्षीय युवक पुण्याला जात असल्याचे सांगून २६ नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडला; परंतु अद्यापपर्यंत तो घरी न परतल्याने, त्याच्या कुटुंबीयांनी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. आरती अरुण ठोकळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा योगेश अरुण ठोकळ हा इयत्ता दहावीमध्ये शिकतो. २६ नोव्हेंबर रोजी त्याने पुणे येथे कामाला जात असल्याचे सांगितले आणि घराबाहेर पडला; परंतु अद्यापपर्यंत तो घरी परतला नाही. मूर्तिजापूर पोलिसांनी मुलगा हरवल्याची तक्रार नोंदविली. योगेशची उंची ५.६ फूट आहे. त्याचा वर्ण निमगोरा असून, कपाळावर उजव्या बाजूस जखमेची खूण आहे. अंगामध्ये पिवळा चौकडीचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. छाया: १३ सीटीसीएल: ४९(योगेश ठोकळ)000000000000000000000000000