शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त ट्विट, सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 17:36 IST

काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणं स्वतःच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवणं काँग्रेसच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसनं ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र या जाळात काँग्रेस स्वतःच अडकल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट मंगळवारी (21 नोव्हेंबर) ट्विटरवर शेअर करण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे या तिघांच्या फोटोवर आधारित एक मीम पोस्ट ट्विटरवर पोस्ट करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्यावर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भारतीय युवा काँग्रेसच्या 'युवा देश' या ऑनलाइन नियतकालिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हे अपमानास्पद तसंच वादग्रस्त 'मीम' तयार केले आहे. दरम्यान,  सोशल मीडियातून टीकेचा भडिमार झाल्यानंतर हे वादग्रस्त ट्विट डिलिट करण्यात आले. 

'मीम'मध्ये नेमका काय आहे मजकूर? पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातील संभाषणाचे मीम तयार करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'विरोधीपक्ष आपल्यावर कशा पद्धतीचे मेमे बनवतात, असे सांगत आहेत. तर त्याला मेमे नाही तर मीम म्हणतात असे ट्रम्प यांनी मोदीं सांगितले. तर थेरेसा मे मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना 'तुम्ही चहाच विका' असे अपमानास्पद व वादग्रस्त मीम तयार करण्यात आले. काँग्रेसची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागली.  त्यानंतर काँग्रेसनं तातडीने हे ट्विट डिलीट केलं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प