तरुणाची गळफास लावून आत्महत्या
By Admin | Updated: June 12, 2016 22:35 IST2016-06-12T22:35:33+5:302016-06-12T22:35:33+5:30
जळगाव: जानकी नगरात राहणार्या सागर सिताराम कोळी (वय २०) या तरुणाने रविवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सागर याला दारुचे व्यसन होते, रविवारीही सकाळी तो दारु प्यायलेला होता.

तरुणाची गळफास लावून आत्महत्या
ज गाव: जानकी नगरात राहणार्या सागर सिताराम कोळी (वय २०) या तरुणाने रविवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सागर याला दारुचे व्यसन होते, रविवारीही सकाळी तो दारु प्यायलेला होता.सागर व त्याचे वडील सिताराम कोळी हे दोघंही सेंट्रीगचे काम करायचे. रविवारी सकाळी त्याची आई हिराबाई ही शेजारीच राहणार्या प्रवीण बडगुजर याच्या घरी गेली होती, प्रवीण मुलाला खेळवत असताना घरी गेल्यानंतर पाहिले तर सागर हा खाली पडलेला होता व त्याच्या गळ्यात साडी होती, गुदमरल्यासारखे तो करत होता. यावेळी शेजारील लोकांनी त्याला कांदा सुंगवला.हा प्रकार समजल्यानंतर प्रवीणच्या पत्नीने त्याला घरी बोलावून घेतले. प्रवीण व त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, तेथे उपचार सुरु करताच त्याची प्राणज्योत मालवली.सागर हा एकुलता मुलगा होता. बहिण विवाहित असून अमळगाव ता.अमळनेर येथील तिचे सासर आहे. तिला दोन मुले आहेत. जानकी नगरात पार्टेशनच्या घरात हे कुटूंब वास्तव्याला आहे. वडील सिताराम कोळी यांनाही दारुचे व्यसन होते. डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी जानकी नगरात एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती.