भर कार्यक्रमात तरूणाने भाजपा खासदाराच्या श्रीमुखात लगावली

By Admin | Updated: February 6, 2017 17:02 IST2017-02-06T16:30:17+5:302017-02-06T17:02:25+5:30

गुजरातमध्ये सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमात एका तरूणाने भाजपा खासदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना

The youth of the BJP throttled the BJP in the program | भर कार्यक्रमात तरूणाने भाजपा खासदाराच्या श्रीमुखात लगावली

भर कार्यक्रमात तरूणाने भाजपा खासदाराच्या श्रीमुखात लगावली

>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 6 - गुजरातमध्ये एका तरूणाने भाजपाचे खासदार शंकर वेगड यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. एका सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमा दौ-यान एका तरूणाने वेगड यांच्या कानशिलात लगावली. रविवारी ही घटना घडली. 
 
सुरेंद्रनगरचे खासदार वेगड यांना एका  सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमात आमंत्रीत करण्यात आलं होतं. समारंभात जमलेल्यांना संबोधित करण्यासाठी  खासदार स्टेजवर चढले असताना  रामभाई भारवाड नावाचा एक तरूण स्टेजवर चढला आणि त्याने खासदारांच्या हातातून माईक खेचला. यानंतर त्याने खासदाराच्या कानशिलात लगावली.
 
मात्र, त्याने असं का केलं याबाबत माहिती मिळू शकलेली नाही तसेच कोणतीही तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   
 

Web Title: The youth of the BJP throttled the BJP in the program