कोलकात्यात तरुणाला अटक

By Admin | Updated: March 7, 2016 02:59 IST2016-03-07T02:59:05+5:302016-03-07T02:59:05+5:30

वायुसेनेच्या पनागड बेस स्टेशनजवळ एका संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो संशयास्पद स्थितीत फिरत असताना गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

The youth arrested in Kolkata | कोलकात्यात तरुणाला अटक

कोलकात्यात तरुणाला अटक

कोलकाता : वायुसेनेच्या पनागड बेस स्टेशनजवळ एका संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो संशयास्पद स्थितीत फिरत असताना गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गावकऱ्यांना दोन तरुण पनागड वायुसेनेच्या बेस स्टेशनजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असताना आढळले. त्यातील एकाला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नेमक्या याचवेळी गावातील एका पेट्रोल पंपाजवळ काही वाहनांना आग लागल्याची माहिती मिळाल्याने वायुसेनेच्या अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेस स्टेशनजवळ घातपाताचा कुठलाही प्रकार घडला नाही. संशयिताची ओळख अद्याप पटली नसून, चौकशी सुरू आहे.

Web Title: The youth arrested in Kolkata