शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या नशेपायी जवान शहीद होतात!

By admin | Updated: December 15, 2014 04:12 IST

अमली पदार्थांची नशा एक भयंकर आजार आणि एक सामाजिक समस्या आहे़ कुटुंब, समाज आणि देश या सर्वांना गिळंकृत करणारा हा भस्मासूर आहे़

नवी दिल्ली : अमली पदार्थांची नशा एक भयंकर आजार आणि एक सामाजिक समस्या आहे़ कुटुंब, समाज आणि देश या सर्वांना गिळंकृत करणारा हा भस्मासूर आहे़ या दलदलीपासून मुलांना वाचवायचे असेल तर त्यांना ध्येयवादी बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले़ नशेच्या या गर्तेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांच्या मदतीसाठी एक टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली़ तुमची क्षणाची नशा होते, पण त्याची किंमत सीमेवरील जवान शहीद होऊन चुकवतात, याची कल्पना तरी आहे का, असा सवालही त्यांनी नशेच्या आहारी गेलेल्यांना केला.रविवारी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी नशाखोरीच्या मुद्द्यावर देशाला संबोधित केले़ ज्या माउलीचा पोटचा गोळा नशेच्या आहारी जातो, तो केवळ स्वत:च नाही, तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतो़ केवळ त्याचे कुटुंबच नाही, तर समाज, देशाचीही हानी होती़ नशा एक भयंकर आजार आहे़ एक सामाजिक समस्या आहे़ या समस्येशी चार हात करायचे असतील तर मानसशास्त्रीय दृष्टीने, सामाजिक अंगाने आणि वैद्यकीय उपचारांनी याविरुद्ध लढावे लागेल, असे ते म्हणाले़ड्रग्ज, नशा ही ‘थ्री डी’ अर्थात डार्कनेस, डिस्ट्रक्शन आणि डिव्हॅस्टेशन या तीन कुप्रवृत्तींना चालना देते़ हे व्यसन जीवनात अंधकार (डार्कनेस) पेरते़ विध्वंस (डिस्ट्रक्शन) आणि विनाश (डिव्हॅस्टेशन) घडवून आणते़ या अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाच्या वाटा दाखवायचे काम कुटुंब, समाज आणि सरकार एकत्र येऊन करू शकते, असे मोदी म्हणाले़ सोशल मीडियावरील सक्रिय लोकांनी यासाठी ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ मोहीम चालवली़ क्रीडा, कला व सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गजांनीही जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)> मोदींनी युवकांपुढे उभे केले अनेक प्रश्ननशेच्या आहारी गेलेल्या युवकांपुढे मोदींनी अनेक प्रश्न उभे केले़ दोन-चार तास नशेची झिंग अनुभवण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांना मी विचारू इच्छितो की, ज्या पैशाने तुम्ही अमली पदार्थ विकत घेता, तो पैसा कुठे जातो? हे अमली पदार्थांचे पैसे अतिरेक्यांजवळ गेले तर? त्या पैशाने अतिरेकी शस्त्र विकत घेतील व याच शस्त्रांनी रक्षण करणाऱ्या जवानांवर हल्ला चढवतील़ तुमच्या देशाचा एक जवान शहीद होतो, त्यामागे तुमच्या नशेचा पैसा असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? असे अनेक सवाल मोदींनी उपस्थित केले़