शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील 15-20 वर्षे तुमचा नंबर येणार नाही..; राज्यसभेतून अमित शाहांची विरोधकांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:42 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यसभेत आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक-2024 वरील चर्चेला उत्तर दिले.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शाहांनी आज आपत्ती व्यवस्थापन (दुरुस्ती) विधेयक-2024 वर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, गेल्या 10 वर्षात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे आपण राष्ट्रीय तसेच प्रादेशिक आणि जागतिक शक्ती म्हणून उदयास आलो आहोत, हे आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. हे विधेयक देशाची यशोगाथा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आहे. इथे कोणी गैरसमज करून घेऊ नये. मी सरकारच्या यशोगाथेबद्दल बोलत नाही, तर देशाच्या यशोगाथेबद्दल बोलत आहे. पुढील 15-20 वर्षे कुणाचाच नंबर येणार नाही. जे काही काम करायचे आहे, ते आम्हालाच करायचे आहे, असा टोला शाहांनी लगावला.

गृहमंत्री पुढे म्हणाले, काही सदस्यांनी दुरुस्तीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. मला त्यांना सांगायचे आहे की, एखादी इमारत वेळीच दुरुस्त केली नाही तर ती कोसळते. त्यांना वाटते की, कदाचित ते येतील आणि बदलतील, पण पुढची 15-20 वर्षे विरोधकांची सत्ता येणार नाही. जे काही करायचे आहे, ते आम्हालाच करायचे आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आला. या अंतर्गत NDMA, SDMA आणि DDMA ची स्थापना करण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापन हा केंद्र आणि राज्यांचा विषयशाहा पुढे म्हणाले, आता सत्तेचे केंद्रीकरण होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जर तुम्ही संपूर्ण विधेयक काळजीपूर्वक वाचले, तर तुमच्या लक्षात येईल की अंमलबजावणीची सर्वात मोठी जबाबदारी राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची आहे. त्यामुळे फेडरल रचनेचे कोणतेही नुकसान होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन हा केंद्र आणि राज्य सरकारचा विषय आहे. 

आपत्तींचे स्वरूप आणि प्रमाण बदलले आपत्तीचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलूया. हजारो वर्षांपासून आपण निसर्गाच्या संवर्धनाबद्दल बोलत आहोत. आपत्तींच्या पद्धती आणि स्केल बदलले आहेत, त्यानुसार ते बदलावे लागतात, म्हणूनच हे विधेयक आणले आहे. सर्व लोकांकडून आलेल्या 87 टक्के सूचना स्वीकारुन आम्ही हे विधेयक आणले असल्याची माहिती शाहांनी दिली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस