तुमचा नशा घेतोय जवानांचा जीव - नरेंद्र मोदी

By Admin | Updated: December 14, 2014 13:09 IST2014-12-14T12:05:03+5:302014-12-14T13:09:55+5:30

अमली पदार्थांच्या विक्रीतील पैसा दहशतवाद्यांकडे जातो, त्यातून ते शस्त्रास्त्रे खरेदी करतात आणि आपल्याच देशाचे रक्षण करणा-या जवानांवर गोळ्या झाडतात. त्यामुळे विनाशाचे कारण ठरणा-या अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर पडा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केले.

Your drug addicts - Narendra Modi | तुमचा नशा घेतोय जवानांचा जीव - नरेंद्र मोदी

तुमचा नशा घेतोय जवानांचा जीव - नरेंद्र मोदी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - तुम्ही नशेसाठी जे अमली पदार्थ विकत घेता, त्याचा पैसा दहशतवाद्यांकडे जातो, त्यातून ते शस्त्रास्त्रे खरेदी करतात आणि आपल्याच देशाचे रक्षण करणा-या जवानांवर गोळ्या झाडतात. त्यामुळे विनाशाचे कारण ठरणा-या अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर पडा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केले. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधताना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या मुद्द्यावर भर दिला.
ड्रग्स व अमली पदार्थांचे सेवन करणे हे स्टाईल स्टेटमेंट नसून ते फक्त आयुष्य उध्वस्त करतात असेही त्यांनी सांगितले. डार्कनेस (अंधार), डिस्ट्रक्शन ( विध्वंस) व  डिव्हास्टेशन ( विनाश) हे असे ड्रग्जचे हे ३-डी परिणाम आहेत. ही एक मानसिक-सामाजिक-वैद्यकीय समस्या असून अममली पदार्थ वाईट असतात, त्याचे सेवन करणारा युवक वाईट नसतो. कोणतीही वाईट सवय ही अचानक लागत नसते, ती हळूहळू वाढत जाते, असे सांगत प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांच्या होणा-या बदलाचा अब्यास केला पाहिजे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. ज्यांच्यासमोर एखादे ध्येय असेल त्यांना अशी व्यसने लागत नाही, त्यामुळे आपल्या मुलांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवायचे असेल तर त्यांना ध्येयवान बनवा, असे आवाहन मोदींनी पालकांना केले. ड्रग्सचा प्रश्न संपवण्यासाठी एक हेल्पलाईनही सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगत सोशल मीडियावरही #drugsfreeindia नावाने मोहिम चालवण्याचे आवाहन त्यांनी तरूणांना केले.
 
दरम्यान यावेळी त्यांनी आपण अंध क्रिकेट वर्ल्डकप जिंकणा-या भारतीय संघाची आपम नुकतीच भेट घेतल्याचे सांगत त्यांचा उत्साह पाहून आपल्याला उर्जा मिळाल्याने नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केले.

 

Web Title: Your drug addicts - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.