शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

या हँडसम IAS अधिकाऱ्याला तरुणी खुल्लमखुल्ला करताहेत प्रपोज, पाहा कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:59 IST

IAS Athar Amir Khan: आयएएस अथर आमिर खान हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक पेजवर नेहमी आपले फोटो शेअर करत असतात. हल्लीच त्यांनी आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर एका तरुणीने कमेंट करून त्यांच्यासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली.

नवी दिल्ली - आयएएस अथर आमिर खान हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक पेजवर नेहमी आपले फोटो शेअर करत असतात. हल्लीच त्यांनी आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर एका तरुणीने कमेंट करून त्यांच्यासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. या तरुणीच्या कमेंटवर काही युझर्सनी तिला ट्रोल केले. त्यानंतर या तरुणीनेही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

३० वर्षांचे आयएएस अधिकारी अतहर अमीर यांनी आपले जे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ते एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. त्यांच्या फोटोवर Syednaziaashraf नावाच्या एका युझरने कमेंट करून सांगितले की, मी या व्यक्तीसोबत लग्न करू इच्छिते. त्यानंतर युझर तिला ट्रोल करू लागले. मात्र ती तरुणी एकटी नव्हती. तिच्यासारख्याच अनेकींनी या फोटोवर आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.

त्यानंतर ट्रोलर्सला उत्तर देताना Syednaziaashraf ने लिहिले की, मला नाही माहिती की, लोकांना काय झालंय आणि का ते तुमच्यासोबत मतलबीपणे वागतात. भावना व्यक्त करण्यात काहीच चुकीचे नाही आहे. ते आपली मानसिकता बदलतील, अशी मला अपेक्षा आहे. जर लोकांकडे बोलण्यासाठी काही चांगलं नसेल तर त्यांनी अजिबात बोलता कामा नये.

इन्स्टाग्रामवर आयएएस अतहर आमिर खान यांचा फोटो ९० हजार हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तसेच हजारो युझर्सनी कमेंट केली आहे. एका युःझरने लिहिले की, सर कुणासोबत डेटवर आहात. तर एका अन्य युझरने Most hanssome IAS in India असी कमेंट केली आहे.

यूपीएससीच्या २०१५ च्या परीक्षेत संपूर्ण देशातून दुसरा क्रमांक पटकावणारे अतहर आमिर सध्या श्रीनगरमध्ये पोस्टिंगवर आहेत. अतहर हे श्रीनगरच्या महानगरपालिकेचे कमिश्नर आणि श्रीनगर स्मार्ट सिटी लिमिटेडचे सीईओ आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर सुमारे ६ लाख फॉलोअर्स आहेत. तर फेसबूकवर दीड लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात. ते त्यांच्या लुकमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत.

अतहर आमीर यांचा विवाह यूपीएससीमधील टॉपर आयएएस टीना डाबी हिच्याशी झाला होता. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर टीना डाबी यांनी हल्लीच आयएएस प्रदीप गवांडे यांच्याशी विवाह केला आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर