शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो, सरकारी नोकऱ्यांमागे धावू नका; पान टपरी सुरू करा- बिप्लब देव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:29 IST

अजब विधानांची मालिका सुरूच

त्रिपुरा: महाभारतातील इंटरनेट, डायना हेडन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी तरुणांना अजब सल्ला दिलाय. सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागण्यापेक्षा पान टपरी सुरू करा, असं अजब विधान देव यांनी केलंय. 'सरकारी नोकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे राजकीय पक्षांच्या मागे फिरुन वेळ वाया घालवण्यापेक्षा तरुणांनी पान टपरी सुरू करावी,' असं देब म्हणाले.तरुणांनी स्वत:चा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करावा, असं देब यांनी सांगितलं. 'तरुणांनी स्वयंरोजगार मिळवावा. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घ्यावं. पान टपरी सुरू करण्यासोबतच पशुपालन क्षेत्रातही तरुणांना व्यवसायाची संधी आहे. दुग्धोत्पादन क्षेत्रातही तरुणांना चांगला वाव आहे,' असं देब म्हणाले. त्रिपुरा पशुवैद्यकीय परिषदेनं आयोजित केलेल्या एका शिबिरात ते बोलत होते. 'कोणत्याही तरुणानं बँकेकडून किमान 75 हजार रुपयांचं कर्ज घेतलं, तरी तो महिन्याला किमान 25 हजार रुपये कमावू शकतो,' असंही देब यांनी म्हटलं.तरुण त्यांच्या संकुचित मानसिकतेमुळे व्यवसायाकडे वळत नाहीत, असंही देब म्हणाले. यासाठी त्यांनी त्रिपुरात 25 वर्षे सत्तेत असलेल्या माकपला जबाबदार धरलं. 'पदवीधर तरुण शेतीकडे वळू शकत नाहीत. त्यांनी कुक्कुटपालन करु नये, अशा संकुचित विचारांमुळेच बेरोजगारी वाढली,' असंही देब यांनी म्हटलं. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारी महिन्यात दिलेल्या मुलाखतीत रोजगाराबद्दल अजब विधान केलं होतं. या मुलाखतीत मोदींना देशातील रोजगार निर्मितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, 'एखादी व्यक्ती रस्त्यावर पकोडे विकत असेल, तर त्याला रोजगार म्हणणार नाही का?,' असा प्रतिप्रश्न मोदींनी केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सत्तेवर आल्यानंतर 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

टॅग्स :Tripuraत्रिपुरा