शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

थिएटरमध्ये अक्षय-कॅटचा रोमँटिक सीन सुरू असतानाच तरुणानं तरुणीला छेडलं, मग प्रत्येक प्रेक्षक बनला हीरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 00:21 IST

आधी मुलीने तिची सँडल काढून त्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर प्रेक्षकही त्या तरुणावर तुटून पडले. आधी या सर्वांनी या तरुणाला चित्रपटगृहात चोप दिला. यानंतर चित्रपटगृहाबाहेर नेऊनही त्याची धुलाई करण्यात आली.

भोपाळमधील संगम चित्रपटगृहात रियल अॅक्शन सीन बघायला मिळाला. येथे सूर्यवंशी चित्रपटाचा शेवटचा शो सुरू होता. अक्षय आणि कॅटरीनाचा रोमँटिक सीन साधारणपणे 12 वाजता पडद्यावर आला. यादरम्यानच, एका तरुणाने मागे बसलेल्या तरुणीशी अश्लील हावभाव केले आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. मग काय, खरा चित्रपटच सुरू झाला.

आधी मुलीने तिची सँडल काढून त्या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर प्रेक्षकही त्या तरुणावर तुटून पडले. आधी या सर्वांनी या तरुणाला चित्रपटगृहात चोप दिला. यानंतर चित्रपटगृहाबाहेर नेऊनही त्याची धुलाई करण्यात आली. मात्र, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. मंगलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पवार यांनी सांगितले, घटनेची माहिती अद्याप आलेली नाही. एकही तक्रारदार पोलीस ठाण्यात पोहोचलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पोलिसांनी तपासासाठी घेतला आहे.

रोमँटिक सीन सुरू असतानाच घढला प्रकार - अक्षय आणि कॅटरिनाच्या रोमँटिक सीनदरम्यान तरुणाने मागे वळून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. यावेळी त्याने 'छोडो कल की बात...', अशी कमेंट केली. एवढेच नाही, तर तो वारंवार मागे वळून संबंधित तरुणीकडे बघत होता. यादरम्यान, मुलीने त्याला थांबवलेही, पण त्याने ऐकले नाही. 

यानंतर, तरुणीने आणि तेथील लोकांनी या युवकाला चोप दिला. यावेळी तो गयावयाही करत होता. मात्र, लोक त्याला मारतच होते. अद्याप संबंधित तरुणाची ओळख पटू शकलेली नाही. जमावाने तरुणाला मंगलवारा पोलीस ठाण्यात नेण्यापूर्वीच, त्याचे मित्र, तेथे आले आणि त्यांनी त्या तरुणाला तरुणीची माफी मागायला सांगितली. यानंतर प्रकरण शांत झाले. आरोपी तरूण जुन्या शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशAkshay Kumarअक्षय कुमारKatrina Kaifकतरिना कैफ