धक्कादायक! मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं बेतलं जीवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:15 PM2024-03-02T20:15:36+5:302024-03-02T20:16:45+5:30

एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुण मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलत होता.

young man talking on mobile after plugging into charger in bikaner | धक्कादायक! मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं बेतलं जीवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

धक्कादायक! मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं बेतलं जीवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील छत्तरगड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुण मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलत होता. याच दरम्यान अचानक व्होल्टेज वाढलं. मोबाईलचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणाच्या घरात एकच गोंधळ उडाला. तरुण हनुमानगड जिल्ह्याचा रहिवासी होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तरगड परिसरातील एका गावाची हायटेन्शन लाईन अचानक नॉर्मल वीजपुरवठा करणाऱ्या लाईनला टच झाली. त्यामुळे अचानक व्होल्टेज वाढल्याने चार्जरवर मोबाईल लावून बोलत असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अचानक वाढलेल्या व्होल्टेजमुळे अनेक घरांतील विद्युत उपकरणेही जळाली.

दुपारी वादळी वाऱ्यामुळे खारवली फिडरमधून बाहेर पडणारी 11 केव्ही लाईन अचानक दुसऱ्या लाईनला टच झाली. त्यामुळे अनेक घरांतील विद्युत उपकरणं जळून खाक झाली. त्यावेळी हनुमानगढ येथील रहिवासी आलम खान हा मोबाईल फोनवर चार्जर लावून बोलत होता. अचानक व्होल्टेज वाढले आणि मोबाईलमधील बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे आलम खान जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

लुकमान खान यांच्या शेतात ठेवलेला सुमारे तीनशे क्विंटल जनावरांचा चाराही हायव्होल्टेजच्या ठिणगीमुळे जळून राख झाला. ग्रामस्थांनी याची माहिती जोधपूर डिस्कॉमच्या इंजिनिअरला दिली. मृताच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हनुमानगड येथे नेला आणि तेथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, फोन चार्जरला लावून बोलत असल्यामुळे मोठे अपघात घडले आहेत.

Web Title: young man talking on mobile after plugging into charger in bikaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.