'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना बॉल उचलण्यासाठी धावला अन् खाली कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:05 PM2024-03-11T12:05:17+5:302024-03-11T12:11:02+5:30

क्रिकेट खेळत असताना तरुण बॉल उचलण्यासाठी धावत होता. त्याचवेळी अचानक तो जमिनीवर पडला.

young man playing cricket ran to pick up ball then he had heart attack died in hospital bijnor | 'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना बॉल उचलण्यासाठी धावला अन् खाली कोसळला

'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना बॉल उचलण्यासाठी धावला अन् खाली कोसळला

अलीकडच्या काळात खेळताना, नाचताना किंवा गाताना हार्ट अटॅकने लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता अशीच एक घटना यूपीच्या बिजनौरमधून समोर आली आहे, जिथे क्रिकेट खेळताना एका तरुणाला हार्ट अटॅकने आला. तो जमिनीवर पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याता मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या तरुणासोबत क्रिकेट खेळणाऱ्या इतर खेळाडूंनाही तरुणाच्या मृत्यूने धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना तरुण बॉल उचलण्यासाठी धावत होता. त्याचवेळी अचानक तो जमिनीवर पडला. जवळच हॉस्पिटल होतं, तिथे उपचारासाठी त्याला तातडीने नेण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं. तरुण एका खासगी रुग्णालयात कर्मचारी होता.

गौरव शर्मा असं तरुणाचं नाव आहे. तो बिजनौरच्या मोहल्ला सोत्यानचा रहिवासी होता आणि एका खासगी रुग्णालयात काम करत होता. 10 मार्च (रविवार) दुपारी गौरव हा त्याच्या मित्रांसोबत हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. सगळे हसत-खेळत होते. त्यानंतर धावत असताना गौरव जमिनीवर पडला. 

गौरवची अशी अवस्था पाहून त्याचे सहकारी खेळाडू घाबरले. ते लगेच गौरवला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गौरव शर्मासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांनी सांगितलं की, जेव्हा तो ब़ॉल उचलण्यासाठी धावला तेव्हा तो अचानक जमिनीवर पडला. कदाचित त्याला हार्ट अटॅक आला असावा. धावत असताना तो अचानक जमिनीवर पडला. लगेच इतर खेळाडूंनी त्याला 20 मीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेले. 

गौरववर उपचार सुरू होते पण तपासणी दरम्यान त्याला पुन्हा दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गौरव शर्माच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट असून ते रडत आहेत. रुग्णालयाचे मीडिया प्रवक्ते हितेश कुमार शर्मा यांनी सांगितलं की, गौरव शर्मा याला उपचारासाठी रुग्णालयात आणलं होतं, तेथे त्यांचा ईसीजी सुरू असताना अचानक त्याला दुसरा हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.

Web Title: young man playing cricket ran to pick up ball then he had heart attack died in hospital bijnor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.