वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का, हे आता २४ तास आधीच कळणार! शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार; सध्या ४ तास आधी येतो चार्ट; लाखो प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:12 IST2025-06-12T09:12:04+5:302025-06-12T09:12:33+5:30

Indian Railway: भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच मिळणार आहे.

You will now know 24 hours in advance whether your waiting list ticket has been confirmed! | वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का, हे आता २४ तास आधीच कळणार! शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार; सध्या ४ तास आधी येतो चार्ट; लाखो प्रवाशांना दिलासा

वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का, हे आता २४ तास आधीच कळणार! शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार; सध्या ४ तास आधी येतो चार्ट; लाखो प्रवाशांना दिलासा

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच मिळणार आहे. यापूर्वी फक्त ४ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात असे, त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे. नवीन निर्णयाचा लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.

हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तत्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी आले कठोर नियम 
रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी काही कठोर नियम लागू केले आहेत. वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. अशा प्रवाशांनी फक्त जनरल कोचमधूनच प्रवास करता येईल. जर कोणी वेटिंग तिकीट घेऊन एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना सापडले तर त्याला दंड आकारण्यात येईल. 
...तर दंड रक्कम किती?
४४० एसी कोच 
२५०स्लीपर कोच
याशिवाय, प्रवाशाने ज्या स्टेशनपासून प्रवास केला आणि ज्या स्टेशनवर पकडले गेले, त्या दरम्यानचा पूर्ण प्रवास भाडेही भरावे लागेल.

तिकिटास दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येणार
आता स्लीपर क्लासच्या तिकिटाला फक्त दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येईल. स्लीपर क्लासचे तिकीट जास्तीत जास्त थर्ड एसी किंवा सेकंड एसीपर्यंतच अपग्रेड करता येईल, फर्स्ट एसीपर्यंत नाही. त्याचप्रमाणे, थर्ड एसीचे तिकीट जास्तीत जास्त फर्स्ट एसीमध्येच अपग्रेड करता येईल.

वेटिंग लिस्टसाठी काय?
२१ मे रोजी भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्ट तिकिटांसंदर्भातील ‘ऑटो अपग्रेड’ प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. आयआरसीटीच्या नव्या नियमानुसार, आता ‘फर्स्ट एसी’च्य कोचमध्ये जागा रिकामी असली, तरी स्लीपर क्लासमधील तिकीट ‘फर्स्ट एसी’मध्ये अपग्रेड केले जाणार नाही.

 

Web Title: You will now know 24 hours in advance whether your waiting list ticket has been confirmed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.