रणगाडे, क्षेपणास्त्रांच्या बळावर आपण वाचू शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:08 IST2018-05-23T00:08:16+5:302018-05-23T00:08:16+5:30
पाक मंत्री; आर्थिक सुधारणांची संधी गमावली

रणगाडे, क्षेपणास्त्रांच्या बळावर आपण वाचू शकत नाही
इस्लामाबाद : पाकिस्तानने आर्थिक विकासाची संधी राजकीय अस्थैैर्यामुळे वाया घालवली. रणगाडे, क्षेपणास्त्रे यांच्या बळावर देश वाचू शकणार नाही. देश आर्थिकदृष्ट्या सबळ व्हायला हवा, असे परखड मत पाकिस्तानचे गृहमंत्री तसेच नियोजन व विकास खात्याचे मंत्री अहसान इक्बाल यांनी व्यक्त केले आहे.
भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे त्यावेळचे अर्थमंत्री सरताझ अझीझ यांच्याकडून आर्थिक सुधारणांची संकल्पना घेऊन तिची भारतात अंमलबजावणी केली. बांगलादेशनेही आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला. मात्र या राजकीय अस्थैैर्यामुळे पाकिस्तानने संधी गमावली, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, पाकिस्तानला पहिली संधी १९६०च्या दशकात चालून आली होती. नंतर १९९०च्या दशकात संधीने दुसऱ्यांदा दरवाजा ठोठावला होता. (वृत्तसंस्था)