पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील उत्तरानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा डिवचले. मोदीजींनी पुन्हा असत्याचा आसरा घेतला, असे म्हणत राहुल गांधींनी पलटवार केला.
यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरताना दिसत आहे. माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टिन फाईल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारला पहिल्या दिवसांपासून घेरले आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देणार होते. पण, विरोधकांच्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण न होताच आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी आज (५ फेब्रुवारी) उत्तर दिले.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेतील भाषण झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत उलट सवाल केला.
विरोधी पक्षनेते गांधी म्हणाले की, "फक्त प्रश्नांनीच इतके घाबरले? मोदीजी सत्यामुळे असे घाबरले की, असत्याच्या आश्रयाला गेले. असो, जो योग्य वाटले, तेच केले", असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले.
पंतप्रधान मोदींचे राज्यसभेतून काँग्रेसवर टीकेचे बाण राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी काँग्रेसला लक्ष्य करताना म्हणाले की, "आम्ही विकसित भारतासाठी जमीन तयार करत आहोत. तर काँग्रेस मोदींसाठी खड्डा खोदण्याचे काम करत आहे. 'मोहब्बत की दुकान' उघडणारे, 'मोदी तेरी खब्र खुदेगी' अशा घोषणा देत आहेत. देशातील नागरिकांसाठी खड्डा खोदण्याचे बोलणारे हे कोणते प्रेमाचे दुकान आहे", अशी टीका त्यांनी केली.
"मोदीसाठी खड्डा खोदणे, हा त्यांची घोषणा नाही, तर त्यांच्या आत असलेल्या तिरस्काराचे प्रतिबिंब आहे. आम्ही ३७० कलमाची भिंत पाडली. पाकिस्तानी दहशतवाद्यांना घरात घुसून मारले. आम्ही ऑपरेशन सिंदूर केले. नक्षलवादापासून देशाला मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे यांना मोदींसाठी खड्डा खोदायचा आहे", असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
Web Summary : Rahul Gandhi countered PM Modi's Rajya Sabha address, accusing him of falsehoods. He questioned Modi's reaction to questions, alleging fear led him to untruth. Modi criticized Congress, stating they're digging a 'grave' for him while he builds India.
Web Summary : राहुल गांधी ने पीएम मोदी के राज्यसभा भाषण का जवाब देते हुए उन पर झूठ बोलने का आरोप लगाया। उन्होंने मोदी की सवालों पर प्रतिक्रिया पर सवाल उठाया और आरोप लगाया कि डर के कारण उन्होंने असत्य का सहारा लिया। मोदी ने कांग्रेस पर निशाना साधते हुए कहा कि वे उनके लिए 'कब्र' खोद रहे हैं जबकि वह भारत का निर्माण कर रहे हैं।