शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:28 IST

इंडिगोच्या एका ३५ वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलटने पोलिसांत तक्रार दिली.

इंडिगो कंपनीच्या एका प्रशिक्षणार्थी पायलटने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात जातीयवादाचा आरोप केल्याचे समोर आले. ट्रेनी पायलटने दिलेल्या तक्रारीनुसार, 'तीन अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले की तो विमान उडवण्यास लायक नाही आणि त्याने जाऊन बूट शिवावे. या प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर

इंडिगोचे अधिकारी मनीष साहनी, तापस डे आणि कॅप्टन राहुल पाटील यांच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार आधी बंगळुरूमध्ये करण्यात आली होती. तिथे पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर, ती तक्रार गुरुग्राम येथे हस्तांतरित करण्यात आली, गुरुग्राममध्ये इंडिगोचे मुख्यालय आहे. गुन्हा कुठेही झाला असला तरी कोणत्याही पोलिस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करता येतो.

पायलटचे आरोप काय?

तक्रारीनुसार, प्रशिक्षणार्थी वैमानिकाने २८ एप्रिल रोजी गुरुग्राम येथील इंडिगोच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीचा उल्लेख केला आहे. ही बैठक सुमारे ३० मिनिटे चालली आणि या दरम्यान तक्रारदाराला सांगण्यात आले की, "तुम्ही विमान उडवण्यास योग्य नाही, परत जा आणि बूट शिवून घ्या. तुम्ही येथे चौकीदार राहण्यासही योग्य नाही." अधिकाऱ्यांना त्याचा राजीनामा हवा असल्याने त्याचा छळ करण्यात आला, असा प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा आरोप आहे.

पायलटने व्यावसायिक छळाला सामोरे जावे लागल्याचे आरोपात म्हटले आहे. तक्रारदाराची कोणत्याही कारणाशिवाय पगार कपात करण्यात आली. पुन्हा प्रशिक्षण घेण्यास भाग पाडण्यात आले आणि कोणत्याही कारणाशिवाय वॉर्निंग पत्रे देण्यात आली. तक्रारदाराने हा विषय उच्च अधिकाऱ्यांसमोर आणि इंडिगोच्या समितीसमोर उपस्थित केला होता. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केला.

टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान