'आज तुम्ही जिवंत आहात, ते PM नरेंद्र मोदी यांच्यामुळे', बिहार सरकारमधील मंत्र्याचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2022 17:09 IST2022-07-31T16:49:36+5:302022-07-31T17:09:38+5:30
'कोरोनाच्या काळात सर्व देशांची स्थिती अतिशय वाईट होती. पण...'

'आज तुम्ही जिवंत आहात, ते PM नरेंद्र मोदी यांच्यामुळे', बिहार सरकारमधील मंत्र्याचे वक्तव्य
वकोरोनाच्या दोन वर्षात देशभरात लाखो लोकांचा जीव गेला. तसेच, कोरोनातून ठीक झालेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, भाजप आमदार बिहारच्या नितीश कुमार सरकारमधील बिहारचे महसूल मंत्री रामसुरत राय यांनी पीएम नरेंद्र मोदींमुळे अनेकांचा जीव वाचला, असे म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
ये बिहार सरकार में राजस्व मंत्री रामसूरत राय हैं जिनके अनुसार अगर आप ज़िंदा हैं तो इसके लिए प्रधान मंत्री @narendramodi का शुक्रगुज़ार होना चाहिए @ndtvindia pic.twitter.com/MDN3FzZbUr
— manish (@manishndtv) July 31, 2022
रामसूरत राय हे औरई विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्व देशांची स्थिती अतिशय वाईट होती. तुम्ही टीव्हीवर पाकिस्तानची स्थिती पाहिलीच असेल. पण, आज तुम्ही जिवंत आहात तर ते फक्त नरेंद्र मोदींमुळेच आहे. नरेंद्र मोदींनी कोविड लस आणली नसती, मोफत दिली नसती, तर मोठा अनर्थ झाला असता.