योगराज सिंग यांना कॅन्सर
By Admin | Updated: June 6, 2014 09:20 IST2014-06-06T00:58:10+5:302014-06-06T09:20:27+5:30
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग कॅन्सरतून सावरतोच तो त्याच्या वडिलांनाही कॅन्सर असल्याचे स्पष्ट होत आहे.

योगराज सिंग यांना कॅन्सर
>चंडीगड : भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग कॅन्सरतून सावरतोच तो त्याच्या वडिलांनाही कॅन्सर असल्याचे स्पष्ट होत आहे. भारताचे माजी गोलंदाज योगराज सिंग यांनाही कॅन्सर झाला असून ते अमेरिकेत उपचारासाठी गेले आहेत.
प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तानुसार 56 वर्षीय योगराज हे अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये गळय़ातील टय़ूमर काढण्यासाठी सर्जरी करून घेत आहेत. त्यांच्या गळय़ात कॅन्सर असल्याचे काही महिन्यांपूर्वीच निष्पन्न झाले होते. त्यांनी युवराजच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी अमेरिकेत जाणो पसंत केले. योगराज यांची प}ी सतवीर म्हणाली, ते नेहमी गळय़ात दुखत असल्याची आणि खोकल्याची तक्रार करत असत, परंतु कॅन्सर झाल्याचे आम्हाला कधी सांगितले नाही. ते तात्पुरता औषधोपचार करत असत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले.