शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजून एका ठिकाणाचे नाव बदलणार योगी सरकार, केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 19:52 IST

Uttar Pradsh Yogi Government: यावेळेस योगी सरकार शहराचे नाही तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देयापूर्वी योगी सरकारने तीन शहरांची नावे बदलली आहेत.

नवी दिल्ली:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी यापूर्वीच राज्यातील तीन प्रमुख ठिकाणांची नावं बदलली आहेत. योगी सरकारने इलाहाबादचे प्रयागराज, मुगलसरायचे दीनदयाल उपाध्याय नगर आणि फैजाबादचे अयोध्या केले आहे. आता परत एकदा अजून एका ठिकाणाचे नाव बदलले जाणार आहे. पण, यावेळेस शहराचे नाव नाही, तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले जाणार आहे.

रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्तावमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी अनेकदा जिथे गरज असेल तिथे नाव बदलले जाणार, असे म्हटले आहे. आज झांसी रेल्वे स्टेशन (Jhansi Railway Station) चे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.  

ही आहे नाव बदलण्याची प्रक्रियाकेंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, झांसी रेल्वे स्टेशनचे नाव ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार, संबंधित संस्थांशी चर्चा करुन त्यांचे मत मागवले जाईल आणि त्यानंतर नाव बदलण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. कोणत्याही ठिकाणाचे नाव बदलण्याची परवानगी रेल्वे मंत्रालय आणि डाक व भारतीय सर्वेक्षण विभागाच्या NOC नंतर गृह मंत्रालयाकडून मिळते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाjhansi-pcझांसी