योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 06:41 IST2022-03-25T06:39:53+5:302022-03-25T06:41:44+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि देशातील ६० प्रमुख उद्योगपतींना निमंत्रण

Yogi Adityanath's grand oath today for 2nd inning in UP, PM to attend | योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार

- राजेंद्र कुमार

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. योगी आदित्यनाथ हे शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते, उद्योगपती, संत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि देशातील ६० प्रमुख उद्योगपतींना निमंत्रण देण्यात आले आहे. येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल योगी आदित्यनाथ यांना शपथ देतील. या सोहळ्याला भाजपशासित मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. योगी यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीच्या लोकांसह ५० पेक्षा अधिक संतांना निमंत्रण दिले आहे. 

आठ हजार पोलीस
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वरिष्ठ सदस्यांसह प्रमुख संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांचे सहकारी रालोदचे जयंत चौधरी यांनी कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.
योगगुरू रामदेव बाबा, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार कार्यक्रमात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील ८ हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत.

Web Title: Yogi Adityanath's grand oath today for 2nd inning in UP, PM to attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.