शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

योगींचा थेट इशारा; इस्रायल युद्ध परिस्थितीवर सरकारविरुद्ध बोलू नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 10:48 IST

नवरात्री आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला.

लखनौ - इस्रायलमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांत चर्चा होत आहे. अनेकजण या युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करत आहेत. केंद्रातील भारत सरकारने इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांसमवेत फोनवरुन चर्चाही झाली. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायल व हमास यांच्यातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. इस्रायल व फिलिस्तानी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धावरुन अलीगढ युनिव्हर्सिटीत पडसाद उमटले होते. 

अलीगढ युनिव्हर्सिटीत हमास आणि फिलिस्तानच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर, योगी सरकारने कडक भूमिका घेत पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. इस्रायल व हमास युद्धात भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेविरुद्ध कोणीही विधानं केली किंवा तशी कृती केल्यास त्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

नवरात्री आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला. यावेळी, योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या आहेत. त्यानुसार, इस्रायल व हमास युद्धजन्य परिस्थितीत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेविरुद्ध कुणीही भूमिका घेता कामा नये. तशा प्रकारचे विधानं किंवा कृती दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्वच धर्मगुरुंशी यांसदर्भात संवाद साधावा. सोशल मीडिया किंवा धर्मस्थळाच्या ठिकाणी कुठेही भारत सरकारचया भूमिकेविरुद्ध कोणीही आवाज करू नये, अशी भूमिका मुख्यमंत्री योगींनी घेतली आहे. यासंबंधी कोणीही तसे कृत्य केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल व हमास यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर अनेकजण भाष्य करत आहेत. सोशल मीडियावरही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. भारत सरकारने भूमिका स्पष्ट केल्यानंतर काही जणांनी सरकारच्या भूमिकेचा विरोध करत हमासचं समर्थनही केल्याचं पाहायला मिळालं. यातच ९ ऑक्टोबर रोजी अलिगढ युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थ्यांनी हमास संघटनेच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. यावेळी, वुई स्टँड फिलीस्तान अशी नारेबाजीही करण्यात आली. तसेच, AMU विद्यार्थ्यांनी अल्ला हू अकबर अशी घोषणाही दिली होती.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाlucknow-pcलखनऊIsraelइस्रायलwarयुद्धTerrorismदहशतवाद