शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

शेतकरी आंदोलन: योगी सरकार अ‍ॅक्शनमध्ये!; आंदोलन स्थळं रिकामी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:11 IST

येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे.

लखनौ :दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकार आता अ‍ॅक्शनच्या तयारीत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, ती ठिकाणे रिकामी करा, असा आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. एवढेच नाही, तर शेतकरी जेथे आंदोलन करत आहेत, त्यांनी आजच ती ठिकाणं सोडावीत. त्या सर्वांना घरी जाण्यासाठी सरकार मोफेत सुविधा देईल, असेही सरकारने म्हटले आहे. 

यासाठी गाझीपूर सीमेवर बसेरदेखील पोहोचल्या आहेत. सध्या येथे जवळपास 1200 शेतकरी उपस्थित आहेत. यूपीमध्ये सध्या दिल्ली यूपी बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे. तसेच मथुरा आणि आग्र्यात सुरू असेलेली आंदोलनं संपली आहेत. बरेली, बागपत, नोएडा आणि बुलंदशहरातीलही आंदोलनं संपुष्टात आली आहेत.यूपी गेटवर अद्यापही काही लोक -उत्तर प्रदेशचे एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी सांगितले की, 26 जानेवारीला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर काही शेतकरी संघटनांनी स्वेच्छेने चिल्ला बॉर्डर आणि दलित प्रेरणा स्थळावरून आंदोलन मागे घेतले. बागपत येथे लोकांना समजावल्यानंतर त्यांनीही रात्री आपले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, यूपी गेटवर अद्यापही काही लोक आहेत. पण, त्यांची संख्या अत्यंत कमी आहे.राजधानी दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. यानंतर आता या आंदोलनाशी संबंधित शेतकरी संघटना स्वतःच आंदोलन संपवत असल्याच्या घोषणा करत आहेत.

दिल्ली पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये -ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाdelhi violenceदिल्ली