शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

Yogi Adityanath : योगींची मोठी घोषणा; 3 महिन्यांसाठी पुन्हा मोफत रेशन योजना लागू, 15 कोटी लोकांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 12:11 IST

Yogi Adityanath : योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जून 2021 पर्यंत राज्यातील 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

लखनऊ : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath Government) मोफत रेशन योजनेचा लाभ वाढवण्याचा निर्णय घेतला. यूपी सरकारच्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीच्या पहिल्या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रसार माध्यमांना दिली. योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जून 2021 पर्यंत राज्यातील 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही मोफत रेशन योजनेला पुढील 3 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 15 कोटी लोकांना होणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा पहिला निर्णय घेतला आहे. याची माहिती देण्यासाठी मी स्वतः तुमच्यामध्ये आलो आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

दरम्यान, यूपी मोफत रेशन योजनेंतर्गत, लाभार्थी कुटुंबांना डाळी, साखर, खाद्यतेल, मीठ यांसारख्या मोफत अन्नपदार्थांसह 35 किलो रेशन घेण्याचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचा लाभ देण्यात येत होता. यानंतर योगी सरकारने ही योजना मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता यूपीच्या नवीन मंत्रिमंडळाने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजेच जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शिधापत्रिकाधारकांना मिळतो योजनेचा लाभयूपीतील शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ तसेच इतर वस्तूंचा समावेश होता. योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना गहू, तांदूळ याबरोबरच साखर, डाळी, तेलाची पाकिटे, मिठाची पाकिटे आदींचे वाटप करण्यात येत आहे. गहू-तांदूळ योजनेंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला 35 किलो धान्य दिले जात आहे. याशिवाय, 1 लिटर तेलाचे पाकीट, 1 किलो डाळ, 2 किलो साखर आणि एक किलो मीठही दिले जात आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश