शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:11 IST

भाजप नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल तीनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षानं २०२२ साठी आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये फारसं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसू लागलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र दिल्लीतील नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंदयोगी आदित्यनाथ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे पक्षांतर्गत संघर्ष वाढल्याचं बोललं जात आहे. याबद्दलच्या प्रश्नांना खुद्द योगींनीच एका मुलाखतीतून उत्तरं दिली आहेत. माझ्या मनात कोणत्याही राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाहीत, असं योगी म्हणाले. 'मी खासदार होतो, त्यावेळीही माझ्या कोणत्याही महत्त्वाकांक्षा नव्हत्या आणि आजही नाहीत. मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे,' असं योगींनी सांगितलं. ते टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीतभाजपकडे विकासाची दृष्टी आहे. देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी आम्ही कार्यरत आहोत. पंतप्रधान मोदींच्या अभियानात आम्ही काम करत आहोत, असं योगी पुढे म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून राज्य प्रगतीपथावर आहे. राज्याचा विकास होतोय यापेक्षा मोठा दुसरा आनंद असू शकत नाही. माझ्या कोणत्याही राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाहीत, असं योगींनी स्पष्ट केलं आहे. भाजप नेतृत्त्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न योगींनी केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. या निवडणकीत आम्ही दोन तृतीयांश जागा जिंकून सत्ता कायम ठेवू, असा विश्वास योगींनी व्यक्त केला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश