मिटमिटा मंदिरात योग दिवसऔरंगाबाद : विश्वयोगी स्वामी श्री मच्छिंद्रनाथ मंदिरात २१ जून रोजी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम योगेश्वरानंद चित्रकूट, करवी येथील नाथ गादीचे विद्यमान अधिपती डॉ. मंगलनाथ महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. योगासनांची प्रात्यक्षिके महेश पूर्णपात्रे गुरुजी हे उपस्थितांकडून करून घेणार आहेत. सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून संतोष धुमाळ, विकास अधिकार, विसूभाऊ वागळे किंवा श्री प्रतिष्ठान ट्रस्ट स्वामी मच्छिद्रनाथ मंदिर मिटमिटा येथे संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मिटमिटा मंदिरात योग दिवस
By admin | Updated: June 19, 2015 14:08 IST