कर्जाला होकार, पण अनुदानाला नकार; दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होतेय घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 05:06 IST2025-02-18T05:04:57+5:302025-02-18T05:06:00+5:30

२०२५-२६ साठी केंद्राचा अनुदान खर्च सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि जीडीपीच्या तुलनेत सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरणार आहे.

Yes to loan, but no to subsidy; The amount given as subsidy is decreasing every year | कर्जाला होकार, पण अनुदानाला नकार; दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होतेय घट

कर्जाला होकार, पण अनुदानाला नकार; दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होतेय घट

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भत्ते किंवा अनुदानांपेक्षा कर्जे देणे आणि पत वाढवणे यावर मोदी सरकारचे लक्ष केंद्रित आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. २०२५-२६ साठी केंद्राचा अनुदान खर्च सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि जीडीपीच्या तुलनेत सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत थकीत एकूण कर्ज २०२१-२२ मध्ये ९.३७ लाख कोटींवरून वाढून २०२३-२४ मध्ये ९.८२ लाख कोटींवर  पोहोचले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेने (पीएमएमवाय) मंजूर केलेल्या कर्जांमध्ये ५९ टक्के वाढ नोंदवली गेली. ती २०२१-२२ मध्ये ३.३९ लाख कोटींच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ५.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

काेणती अनुदाने कमी?

२०२४ मध्ये कारागीर आणि शिल्पकारांसाठी सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेत ५६१ कोटींचे  रुपयांचे कर्ज दिले. २०२०-२१ मध्ये ७,५८,१६५ कोटी असलेले अनुदान बिल २०२३-२४ मध्ये ४,३४,८५८ कोटींपर्यंत कमी झाले. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ही रक्कम आणखी कमी करून ४,२६,२१६ कोटी केली आहे.

स्टँड-अप इंडिया योजनेने कर्जाची रक्कम जवळजवळ दुप्पट केली आहे. २०२१-२२ मध्ये ४,५०० कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये ८,८९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांतर्गत (पीएम-एफएमई) योजनेत दोन वर्षांत कर्जांमध्ये जवळपास ३० पट वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये २३२ कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये ६,९४९ कोटी रुपये झाले आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधीमध्ये साडेसात पट वाढ

कृषी पायाभूत सुविधा निधीत साडेसात पट वाढ झाली आहे. कर्जे २०२१-२२ मध्ये ५,४१० कोटींवरून २०२३-२४ मध्ये ४०,०८२ कोटींपर्यंत वाढली आहेत.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधीअंतर्गत कर्जे जवळजवळ तिप्पट झाली आहेत. २०२१-२२ मध्ये २,३७२ कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये ६,८९३ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत.

Web Title: Yes to loan, but no to subsidy; The amount given as subsidy is decreasing every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.