येवला- गारपीटग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचीत (बातमीचा जोड)
By Admin | Updated: May 6, 2014 17:09 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T17:09:04+5:30
चौकटीत-

येवला- गारपीटग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचीत (बातमीचा जोड)
च कटीत- ३० एप्रिल रोजी येवला तालुक्याच्या पश्चिम भागातील मुखेड (६), नेवरगाव (३७), एरंडगाव (१०) अशा ५३ शेतकर्यांच्या डाळींबबागांचे ३७ हेक्टरचे नुकसान झाले होते. सुमारे तीन कोटी ७० लाखांचे डाळिंबाचे नुकसान या परिसरात झाले असून, याचे पंचनामे, कृषी, महसूल व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने केले आहेत. कृषी खात्याने पंचनाम्याचा लेखी अहवाल येवला तहसील कार्यालयात पाठविला आहे. याबाबतही कार्यवाही चालू असल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांनी सांगितले. या परिसरात डाळींब उत्पादक शेतकरी डाळिंबाच्या बागाच्या मोठ्या नुकसानीने हतबल झाले आहेत. निसर्गाचा कोप झाला. गारपीट झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. -सुरेश कदम शेतकरी, नेवरगाव.- (वार्ताहर)---