येमेनला भारतीय युद्धनौका रवाना
By Admin | Updated: April 1, 2015 01:37 IST2015-04-01T01:37:55+5:302015-04-01T01:37:55+5:30
येमेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी धाडलेल्या भारतीय युद्धनौका भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेवरील दोन प्रवासी जहाजांचे सागरी चाचांपासून रक्षणही करणार आहेत

येमेनला भारतीय युद्धनौका रवाना
नवी दिल्ली : येमेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी धाडलेल्या भारतीय युद्धनौका भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेवरील दोन प्रवासी जहाजांचे सागरी चाचांपासून रक्षणही करणार आहेत. नौदल उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल पी. मुरुगेसन यांनी मंगळवारी येथे ही माहिती दिली.
येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दोन युद्धनौका आणि दोन प्रवासी जहाजे रवाना करण्यात आली आहेत.