शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यंदाचा साखर हंगाम दहा वर्षांतील दुसरा नीचांकी हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:32 IST

५५ लाख टनांवर उत्पादन घसरणार

ठळक मुद्देसाखर हंगाम केवळ ९० दिवस चालेलगेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ५२.२० लाख टनांची घट देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सुमारे ४० टक्के क्षेत्र उत्तर प्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज

पुणे : गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती व यंदाची अतिवृष्टी या कचाट्यात ऊस गाळप हंगाम सापडला आहे. गेल्या दहा वर्षांतील नीचांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर हंगाम केवळ ९० दिवस चालणार आहे. साखरेचे उत्पादन ५५ लाख टनापर्यंत घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ५२.२० लाख टनांची घट होईल.देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमधे आलेला पूर, अतिवृष्टी व गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊसक्षेत्र यामुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मराठवाडा व सोलापुरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम ९० व कर्नाटकातील गाळप हंगाम १०० दिवस चालेल. उत्तर प्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज आहे.  आॅगस्ट व सप्टेंबरमधे राज्यात आलेल्या पुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०१८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरून ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे ६२ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, साखर उत्पादनात ५५ लाख टनांपर्यंत घट होईल, असा सुधारित अंदाजआहे. असे झाल्यास २००९-१० पासूनचा हा दुसरा नीचांकी गाळप हंगाम ठरेल. यापूर्वी २०१६-१७मध्ये नीचांकी ४२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. राज्यात २०१७-१८ व २०१८-१९ या हंगामात राज्यात १०७ लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले होते. सलग दोन वर्षांच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यात तब्बल ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. या हंगामातील साखरेच्या कमी उत्पादनामुळे शिल्लकी साखर बाजारात आणणे शक्य होईल, असे साखर संघातील अधिकाºयांनी सांगितले. .......साखर स्थिती    २०१९-२० अंदाज    २०१८-१९ प्रत्यक्ष स्थितीसाखर उत्पादन    ५५    १०७.२स्थानिक खप    ७८    ७८.५निर्यात    १८    १५.५हंगामअखेरची शिल्लक    १३.७    ५४.७

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार