शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:26 IST

पक्षीय राजकारणातून संन्यास : लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार

पाटना : अटलबिहार वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणारे आणि मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून भाजपाविरोधात सातत्याने टीकेचा सूर आवळणारे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपालाच राम राम ठोकला. त्यांनी पक्षीय राजकारण कायमचे सोडून लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करत राहणार असल्याची घोषणाही केली.पाटना येथे झालेल्या राष्ट्रीय मंचच्या एका सभेत सिन्हा यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजपचे बंडखोर नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग, आशुतोष आदी हजर होते.राष्ट्रीय पातळीवर नरेंंद्र मोदी यांचा उदय होण्याआधी यशवंत सिन्हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात असत. १९९८ ते २००४ या कालखंडात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सिन्हा यांनी परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री ही महत्त्वाची पदे सांभाळली होती.गैरव्यवस्थापनामुळे नोटाटंचाईदेशातील सध्याच्या चलन तुटवड्याबाबत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाला लक्ष्य केले. सिन्हा म्हणाले की, अर्थमंत्री आणि सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या साºया सबबी चुकीच्या आहेत. नोटा छपाईचा संबंध थेट देशाच्या वाढच्या जीडीपीसोबत असतो. याबाबत सरकार काहीही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही. पैसे काढून घेण्याचे प्रमाण अचानक खूप वाढल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, हा युक्तीवाद कुणालाही न पटणारा आहे.मोदींवर टीकाअर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारनेच संसदेचे कामकाज न होऊ दिले नाही. अर्थ संकल्पीय अधिवेशन पूर्णपणे वाया जात असल्याची सरकारला अजिबात फिकीर नव्हती. विरोधकांची मते जाणून घेण्यासाठी या काळात पंतप्रधानांनी एकही बैठक घेतली नाही. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मंचचे पुढे राजकीय पक्षात रुपांतर करण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीवर जर आपण बोललो नाही तर येणाºया पिढ्या यासाठी आपल्यालाच जबाबदार धरतील.नेत्याला जाब विचारा; खासदारांना खुले पत्रमागच्या आठवड्यात यशवंत सिन्हा यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना खुले पत्र लिहीले होते. त्यात सिन्हा म्हणाले होते की, २०१४ च्या निवडणुकीमध्ये आपण यूपीए सरकारला जोरदार विरोध केला आणि आपले सरकार निवडून दिले. परंतु या सरकारने आपला पुरता भ्रमनिरास केला आहे. आताजागे व्हा, आगामी निवडणुकीच्या आधी आपल्या नेत्याला जाब विचारा. तरच काही सुधारणा करणे शक्य होईल.मोदी विदेशात फिरतात; इथे पोलीस पीडितेला विचारतात कितने आदमी थे!यावेळी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, देशात बलात्कार होत आहेत आणि पोलीस पीडित मुलीला विचारत आहेत, ‘कितने आदमी थे!’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौºयावरही त्यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आज देशात अशी (मुलींवर अत्याचार होत आहेत) स्थिती आहे आणि अशी स्थिती असतानाच पंतप्रधानांना परदेश दौºयांवर जायला आवडते. महिला सन्मान काय असतो हे त्यांना माहित नाही. त्यांनी बायकोला सोडून दिलेले आहे. केवळ लोकप्रियतेसाठी त्यांनी आपल्या वयोवृद्ध आईला रांगेत उभे केले होते. स्वत:ला मुलगी नसल्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’शी त्यांचा काय संबंध असणार?

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा