याकूबच्या दोन्ही भावांचा पॅरोलसाठी अर्ज

By Admin | Updated: July 31, 2015 23:55 IST2015-07-31T23:55:01+5:302015-07-31T23:55:01+5:30

औरंगाबाद : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला गुरुवारी फाशी दिल्यानंतर हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले त्याचे भाऊ युसूफ आणि ईसा यांनी कारागृह प्रशासनाकडे १५ दिवसांच्या पॅरोल रजेसाठी अर्ज सादर केला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

Yakub's brother's application for parole | याकूबच्या दोन्ही भावांचा पॅरोलसाठी अर्ज

याकूबच्या दोन्ही भावांचा पॅरोलसाठी अर्ज

ंगाबाद : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला गुरुवारी फाशी दिल्यानंतर हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले त्याचे भाऊ युसूफ आणि ईसा यांनी कारागृह प्रशासनाकडे १५ दिवसांच्या पॅरोल रजेसाठी अर्ज सादर केला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.
याकूबच्या फाशीची माहिती मिळाल्यानंतर युसूफने जेवण सोडल्याचे कळते. त्यामुळे त्याची प्रकृतीही ढासळत आहे. याकूबच्या अंत्यविधीला त्यांना उपस्थित राहता आले नाही. युसूफ आणि ईसा यांनी मुंबईला जाण्यासाठी जेल प्रशासनाकडे १५ दिवसांची पॅरोल रजा मिळावी, यासाठी अर्ज सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या रजेचा अर्ज प्राप्त होताच प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. याबाबतचा अहवाल प्रशासनाने मुंबई आणि औरंगाबाद पोलिसांकडून मागविला आहे.

Web Title: Yakub's brother's application for parole