शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या संरक्षणासाठी आता ‘यज्ञयागा’चा आधार, भाजपा खासदाराचे देशभरातील ब्राह्मणांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:56 IST

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.

नवी दिल्ली : सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती थोपविण्यात अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने देशाच्या संरक्षणासाठी आता यज्ञयागाचा आधार घेतला आहे.पाकच्या गोळीबारात जवान आणि नागरिकांचे जीव जात असताना, सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पूर्व दिल्लीचे खासदार माहीश गिरी यांनी १८ ते २५ मार्चदरम्यान लाल किल्ल्यासमोरील मैदानावर देशभरातील ब्राह्मणांना बोलावून १०८ यज्ञांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमातील प्रमुख निमंत्रित आहेत. चीन, पाकिस्तानसारख्या बाह्य शत्रूंपासून आणि अंतर्गत हितशत्रूंपासून देशाचे संरक्षण व्हावे, देशाची अर्थव्यवस्था सुधारावी, भारतीयांची बौद्धिक क्षमता वाढावी, यासाठी हा महायज्ञ करण्यात येणार असल्याचे गिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तसेच डोकलाम, पूंछ आदी अस्वस्थ सीमा भागातून मातीआणि पाणी आणून यज्ञशाळा उभारण्यात येणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.श्री योगिनी पीठाच्या छत्राखाली आठ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात हे १०८ यज्ञ होणार असून, त्यात देशभरातील ११११ ब्राह्मण, माँ पारंबा भगवती बगलमुखी यांना आहुती देणार आहेत. या कार्यक्रमासाठी वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे, तसेच शंकर महादेवन आणि कैलाश खैर कार्यक्रमासाठी गाणे तयार करणार आहेत. या यज्ञात मोठ्या प्रमाणात तूप हवी केले जाणार असून, हे तूप देशभरातील घराघरांत फिरून गोळा केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात रथयात्रा काढण्यात येणार आहे.नितीन देसार्इंकडे काम-वैदिक ग्राम उभारणीची जबाबदारी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक