शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Yaas Cyclone: एक कोटी लोकांना वादळाचा तडाखा, १५ लाख लोक झाले बेघर, प. बंगाल, ओडिशामध्ये सर्वाधिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 6:54 AM

Yaas Cyclone: प. बंगाल व ओडिशामध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. 

कोलकाता/बालासोर  : यास चक्रीवादळाचा सर्वात मोठा तडाखा पश्चिम बंगालला बसला असून, तेथील तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे. प. बंगाल व ओडिशामध्ये मिळून १५ लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. या चक्रीवादळामुळे असंख्य झाडे,  विजेचे खांब उन्मळून पडले व हजारो गावातील वीज गेली आहे. ओडिशानंतर यास उद्या, गुरुवारी झारखंडमध्ये पोहोचण्याची शक्यता असून, तिथे अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र लाखो नागरिकांचे वादळाआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. 

- मोठे नुकसान झालेल्या दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर २४ परगणा या जिल्ह्यांची ममता बॅनर्जी शुक्रवारी हवाई पाहणी करणार आहेत. - चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील हवाई वाहतूक बुधवारी थांबविण्यात आली होती.- यास चक्रीवादळामुळे भारतीय नौदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ आदींनी बचावकार्य हाती घेतले आहे.  

उलटलेल्या बोटीतील १० जणांना वाचविलेयास चक्रीवादळामुळे ओडिशातील जगतसिंगपूर जिल्ह्यामध्ये एका नदीत मंगळवारी रात्री बोट उलटली. त्या बोटीतील सर्व दहा प्रवाशांना वाचविण्यात यश आले.  

गावांमध्ये शिरले पाणी ओडिशामध्ये बुधवारी दोन जणांचा मृत्यू झाला. राज्यातील बालासोर जिल्ह्यातल्या अनेक गावात समुद्राचे पाणी शिरले होते.  

अनेक विमाने रद्दमुंबई विमानतळावरून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी सहा विमाने रद्द करण्यात आली आहेत. भुवनेश्वर विमानतळ २५ ते २७ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर झारसुगुडा २६ ते २७ मे पर्यंत बंद ठेवण्यात आले.  

यास चक्रीवादळ गुरुवारी झारखंडमध्ये धडकणार असल्याने सिंगभूम येथील पूर्व व पश्चिम भागातील सुमारे सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. 

देशाच्या पूर्व किनारपट्टी भागात ओडिशातील धामरा बंदर ते बालासोरच्या दरम्यानच्या प्रदेशास यास चक्रीवादळाचा बुधवारी सकाळी जोरदार तडाखा बसला. या परिसरात ताशी १३५ ते १४५ किमी इतक्या वेगाने यास चक्रीवादळ धडकले. त्यात उत्तर ओडिशातील किनारपट्टीवर असलेल्या कित्येक घरांचे तसेच पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले आहे.  

पाच राज्यांत एनडीआरएफच्या  ११३ तुकड्या तैनातयास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल डिझाॅस्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) ओडिशा व पश्चिम बंगालसह पाच राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशात ११३ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यास चक्रीवादळ धडकताच एनडीआरएफ  व अन्य दलांनी केलेल्या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा