वटार येथे रंगली कुस्ती दंगल
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:16+5:302015-08-18T21:37:16+5:30
वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने भव्य कुस्ती दंगल रंगली होती. यावेळी अजित पाटील यांनी लावलेली सर्वात मोठी कुस्ती विष्णू गवळी आणि कृष्णा यांच्यात रंगली होती. अखेर त्या कृष्णा याने बाजी मारत विजेतेपद पटकाविले.

वटार येथे रंगली कुस्ती दंगल
व ार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने भव्य कुस्ती दंगल रंगली होती. यावेळी अजित पाटील यांनी लावलेली सर्वात मोठी कुस्ती विष्णू गवळी आणि कृष्णा यांच्यात रंगली होती. अखेर त्या कृष्णा याने बाजी मारत विजेतेपद पटकाविले.कुस्ती दंगलीसाठी कसमादे प्यातील अनेक नामांकित पहिलवान उपस्थित होते. यावेळी गवळी आणि कृष्णा यांच्यात झालेल्या कुस्तीत पंचाची भूमिका सहा. पो. निरीक्षक संजय गोंगावले यांनी पार पाडली. याशिवाय झालेल्या छोट्या-मोठ्या कुस्त्या पाहण्यासाठीही ग्रामस्थांनी गर्दी केली होती.यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, पंचायत समिती उपसभापती वसंत भामरे, सरपंच रामदास खैरनार, सटाणा सहा. पो. निरीक्षक संजय गोंगावले, उपसरपंच पोपट खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रमुख वैभव गांगुर्डे आदि मान्यवर उपस्थित होते.कुस्त्यांचे आयोजन प्रदीप शांताराम खैरनार व ग्रामस्थांनी केले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बागुल, रामकृष्ण खैरनार, मधुकर खैरनार, ज्ञानदेव खैरनार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)----फोटो कॅप्शन- २१००/- सलामी देताना जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, ज्ञानदेव खैरनार, उपसरपंच पोपट खैरनार, पो. सहायक निरीक्षक संजय गोंगावले, बागालण पंचायत उपसभापती वसंत भामरे, दोन्ही पहिलवान, वैभव गांगुर्डे, आयोजक प्रदीप खैरनार.२) चित्तथरारक क्षणी पंचाची भूमिका बजावताना सटाणा पो.सहायक निरीक्षक वैभव गांगुर्डे.