भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
दावडी : येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० मल्लांनी भाग घेतला. या कुस्त्यांच्या आखाड्यात पन्नास हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली.

भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा
द वडी : येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० मल्लांनी भाग घेतला. या कुस्त्यांच्या आखाड्यात पन्नास हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी देहू, आळंदी, कोरेगाव, खेड, पिंपळे गुरव येथील मल्ल सहभागी झाले होते. आखाड्यात सोमनाथ गाडगे, सचिन वडघुले व शरद बोधे या पैलवानांच्या कुस्त्या गाजल्या. पंच म्हणून बाळासाहेब दुंडे, बबनराव होरे, शिवाजी दुंडे, अनिल गव्हाणे यांनी काम पाहिले. संतोष गव्हाणे, पांडुरंग दुंडे, भाऊसाहेब होरे, रामदास बोत्रे, प्रकाश शिंदे यांनी नियोजन केले. फोटो : दावडी (ता. खेड) येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आखाडा भरविण्यात आला होता. या आखाड्यातील एक चित्तथरारक क्षण.