कामोठेत रंगणार निकाली कुस्त्यांचे जंगी सामने
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
पनवेल : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षांतर्गत क्रीडा आघाडी, जय हनुमान कुस्ती संघ यांच्या वतीने कामोठे येथे दिग्गज पैलवानांच्या निकाली सामन्याचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. कुस्तीतील मातब्बर पैलवान या सामन्यात सहभाग घेणार आहेत.

कामोठेत रंगणार निकाली कुस्त्यांचे जंगी सामने
प वेल : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षांतर्गत क्रीडा आघाडी, जय हनुमान कुस्ती संघ यांच्या वतीने कामोठे येथे दिग्गज पैलवानांच्या निकाली सामन्याचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. कुस्तीतील मातब्बर पैलवान या सामन्यात सहभाग घेणार आहेत. कामोठेतील सुषमा पाटील विद्यालयाच्या मैदानात हे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्या पैलवानाला १ लाख ५१ हजार व चांदीची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या निकाली कुस्त्यांच्या सामन्यात कर्नाटक केसरी पैलवान आप्पा सरगर, हरियाणा केसरी पैलवान सोनू कुमार, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणेचे पैलवान किरण भगत, दिल्ली येथील मोहिंदर सिंह आखाड्याचे पैलवान राकेश कुमार, पैलवान अरविंद शर्मा, हिंद केसरी आखाडा पुणेचे नीलेश लोखंडे आदींसह तब्बल १५० पैलवान या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, नवी मुंबई पोलीस उपायुक्त फत्तेसिंह पाटील , महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडीच्या अध्यक्षा राणी द्विवेदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहतील. या कुस्तीच्या सामन्यांचा जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जय हनुमान कुस्ती संघ कामोठे यांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)