कुस्त्यांच्या आखाड्याने फेडले पारणे

By Admin | Updated: September 8, 2016 01:34 IST2016-09-08T01:34:41+5:302016-09-08T01:34:41+5:30

अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरू असलेला श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली.

Wrestling | कुस्त्यांच्या आखाड्याने फेडले पारणे

कुस्त्यांच्या आखाड्याने फेडले पारणे

ओझर : अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरू असलेला श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली.
कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांची पारणे फेडतील अशा नामवंत मल्लांनी कुस्त्या केल्या. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई, सातारा जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी या आखाड्यास हजेरी लावली.
ओझर आणि परिसरातील शिरोली बुद्रुक, खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, खुर्द, आदी पंचक्रोशीतील गावातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आखाड्यास गर्दी केली होती.
आखाड्याचे लिलावदार प्रकाश मांडे, गणपत कवडे, गजानन रवळे, पागोट्याचे उत्तम कवडे व पानसुपारीचे गजानन कवडे, आनंद टेंभेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आखाड्यात पंच म्हणून किसन मांडे, भास्कर कवडे, हर्षल कवडे, मंगेश मांडे, लक्ष्मण टेंभेकर, पांडुरंग कवडे यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके, सभापती रघुनाथ लेंडे, शिरीष बोऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, जिल्हा युवासेना प्रमुख गणेश कवडे, पंचायत समिती सदस्य गणपत कवडे आदी मान्यवरांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. आखाड्याचे समालोचन देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, माजी अध्यक्ष नावनाथशास्त्री कवडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी केले.
यात्रोत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती देवस्थानने केले. या नियोजनामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिवनेरभूषण विठ्ठलबाबा मांडे, सरपंच अस्मिता कवडे, रेखा धादवड, उपसरपंच समीर मांडे, सुरेश टेंभेकर, देवस्थानचे सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त बबन मांडे, शंकर कवडे, विक्रम कवडे, बाळासाहेब कवडे, पी. बी. जगदाळे, देविदास कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव कवडे, अनिल मांडे, ज्ञानेश्वर कवडे, शारदा टेंभेकर, देवस्थानचे व्यवस्थापक अशोक घेगडे, पांडुरंग कवडे, गणेश टेंभेकर, कर्मचारी वर्ग आदी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. (वार्ताहर)

Web Title: Wrestling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.