शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

"हे खेळाडूंचं आंदोलन नाही, एवढा पैसा आला कुठून?", ब्रिजभूषण यांचे पैलवानांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 20:13 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

brij Bhushan Singh Statement on Wrestlers Protest । नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले असून कुस्तीपटूंनी केलेला विरोध हे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या पक्षाने राजीनामा द्यायला सांगितल्यास मी राजीनामा देईन असे त्यांनी म्हटले आहे. मी कोणते वाईट काम केले आहे ते सांगावे. सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे, दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे मग मी राजीनामा का देऊ असा प्रश्नही सिंह यांनी विचारला. 

आज माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले, "माझ्यावर काय आरोप आहेत हे देखील मला माहिती नाही. अल्पवीयन मुलींनी मागील काही वर्षांपासून आरोप केले आहेत. चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. 'तुकडे तुकडे टोळी', शाहीन बाग, 'किसान आंदोलन' या लोकांचा या आंदोलनात हात असून मी फक्त बहाणा आहे. त्यांचे खरे लक्ष्य मी नसून माझा पक्ष भाजपा आहे, या खेळाडूंना पैसे दिले जातात. शाहीनबागप्रमाणे निषेधाचा विस्तार होत आहे, त्यांना उत्तर प्रदेश आणि हरयाणाचे विभाजन करायचे आहे." 

सिंह यांचे गंभीर आरोप

तसेच माझा राजीनामा फक्त बहाणा असून त्यांना भाजपाला लक्ष्य करायचे आहे. त्यांच्या मागणीनुसार एफआयआर दाखल झाला आहे. आंदोलनात विरोधक सहभागी होत आहेत, प्रियंका गांधी, आज त्यांचे पती गेले होते, अरविंद केजरीवाल यांनी देखील हजेरी लावली. काही बिहारमधील लोकांनी मोदीजी आणि योगी यांची खिल्ली उडवली. हे खेळाडूंचे आंदोलन नसून उद्योगपतींचे आंदोलन आहे. उद्योगपती माझ्याविरूद्ध १० कोटी खर्च करत असून माझ्या जीवाला धोका आहे. एक सामान्य खेळाडू कपिल सिब्बल यांसारख्या वकिलांना ५० लाख कसे काय देऊ शकतो? हळू हळू हे आंदोलन शाहीन बागसारखे होत असल्याचा गंभीर आरोप सिंह यांनी खेळाडूंवर केला आहे.

आंदोलनाचा आज नववा दिवस लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. काल आंदोलनाला आठवडा पूर्ण झाला असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीVinesh Phogatविनेश फोगटArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस