राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक पदक मिळवणारी कुस्तीपटू भाजपात करणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:30 IST2019-08-12T11:19:13+5:302019-08-12T11:30:29+5:30
बबिता फोगाटला विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता

राष्ट्रकुलमध्ये ऐतिहासिक पदक मिळवणारी कुस्तीपटू भाजपात करणार प्रवेश
नवी दिल्ली: राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटूबबिता फोगाट वडिल महावीर यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं महावीर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं. बबिताच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत.
भाजपामधील प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा देताना महावीर फोगाट यांनी केंद्रासह राज्य सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं. 'जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन मोदी सरकारनं ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. याशिवाय हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. पारदर्शक प्रशासन देण्याचं काम खट्टर यांनी केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,' असं मनोहरलाल खट्टर म्हणाले.
बबितानं हरयाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं फोगाट कुटुंबानं सांगितलं. महावीर यांनी याआधी जननायक जनता पार्टीसाठी काम केलं आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजपा प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.